Wednesday 30 September 2015

कट्यार नाटकात एक कविराज नावाच पात्र आहे.... संगीतातलं ज्ञान खूप आहे पण गाता येत नाही ... तर सदाशिव आणी कविराज ह्यांचा एक संवाद कविराज : मी देखील आता गाणं शिकणार... सदाशिव : काय कविराज तुम्ही आता गायन विद्या शिकणार ? कविराज : गायन विद्या नाही रे... गायन कला.. सदाशिव : अहो तेच ते कविराज : तेच ते नाही.... विद्या वेगळी... कला वेगळी.. सदा : कशी ? कवि : विद्या ही बाहेरून आत शिरते... तर कला ही आतून बाहेर पडते.... विद्या ही जगाचं कोडं सोडवते.. तर कला जगाचं कोडं घडवते... विद्येसाठी केवळ मस्तक पुरे... तर कलेसाठी मस्तक आणि ह्रदय दोंही हवीत... विद्या सुपारीसारखी देता येते कोणालाही... तर कला उचलावी लागते तपकिरिसारखी... विद्या ही तालासारखी आहे.. ती शिकता येते आणि शिकवता येते... तर कला ही लयीसारखी आहे... ती मुळात असायला लागते आणि जन्माला येताना वरूनच घेउन यायला लागते..